arrested criminal corona positive

बीड गोळीबार प्रकरणातील एकास अटक!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड, दि.1 : येथील रजिस्ट्री कार्यालयात शेतीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.25) सकाळी 11च्या सुमारास घडली होती. यातील एका आरोपीस मंगळवारी (दि.1) सकाळी ताब्यात घेतले.


सतीश पवार (रा.बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरणात संतोष बबन क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली होती. त्यांच्या फिर्यादीवरून भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, सतीश पवार, प्रमोद पवार, विनोद पवार, रवी पवार, आदित्य पवार आदींवर 307 सह इतर कलमान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांच्याकडे देण्यात आला होता. सदरील आरोपी बीडमध्ये असल्याची माहिती मिळताच उपाधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश पवार यास ताब्यात घेतले, तसेच इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.

Tagged