Devendra Fadnavis Warned Uddhav Thackeray That He Will Take Out Your Scams
मुंबई : महापालिकेतील घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी चोरणारे तुम्ही कफनचोर आहात. तुमच्या घोटाळ्याची मालिका मी बाहेर काढणार,’ असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना दिला. ‘हे अध्यक्ष आहेत की गल्लीतील नेते, हे समजत नाही. आम्ही संयमी, शांत आहोत. पण आम्हाला ‘ईट का जबाब पत्थर से’ देता येतो,’ असे म्हणत फडणवीस यांनी मुंबईत प्रचाराचे रणशिंग फुंकले. मुंबईतील महायुतीच्या सहाही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार त्यांनी त्यांनी व्यक्त केला.
भाजपतर्फे दादर येथील कामगार मैदानात बुधवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार पीयूष गोयल, उत्तर पूर्व मुंबईचे मिहीर कोटेचा, उत्तर मध्य मुंबईचे उज्ज्वल निकम, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.