bail pola and dahi handi

पोळा, दहीहंडीसाठी जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.11 : महाराष्ट्र शासनाने 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकउाऊन कालावधी वाढवला असून या कालावधीमध्ये मोठया प्रमाणात सार्वजनिकस्थळी सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, धार्मिक परिषदा, संमेलने, जमाव तसेच सार्वजनिक स्थळावर कोणत्याही धार्मिक, सांस्कृतीक, राजकिय इत्यादी कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या होणारी दहीहंडी तसेच पोळा, गणेश उत्सव उया कार्यक्रमांना देखील सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्यास बंदी आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तसे आदेश काढले आहेत.
बीड जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यात श्रावण मासामध्ये सण उत्सव गोकुळ आष्टमी, गोपाळकाला, पतेती, पोळा गणेश उत्सव, ऋषी पंचमी यासारखे सार्वजनिक सण उत्सव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव साजरे करण्यास शासनाने याविषयी विशेष परवानगी दिली नसल्यास या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. अपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष असल्याने त्यांनी हे आदेश लागू केले आहेत.

कोणते सण कुठल्या दिवशी

गोकुळ आष्टमी 11 ऑगस्ट आज
गोपाळकाला 12 ऑगस्ट
पतेती 15 ऑगस्ट शनिवार
पोळा 18 ऑगस्ट मंगळवार
गणेश उत्सव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर
ऋषी पंचमी 23 ऑगस्ट रविवार

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged