corona

बीड जिल्हा; 89 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.5 : गुरुवारी (दि.5) आरोग्य प्रशासनाला 698 कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 609 निगिटेव्ह आढळून आले आहेत. तर 89 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 19, बीड 23, धारुर 4, गेवराई 4, केज 4, माजलगाव 6, परळी 2, पाटोदा 8, शिरुर 5, वडवणी 9 अशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. तर आज जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या 76 जणांना सुट्टी होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 13 हजार 778 कोरोना बाधित आढळून आले. त्यापैकी 432 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना बाबत काळजी घ्यावी, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगसह नियमांचे पालन करावे असे अवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Tagged