चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार वाळूमाफियांवर गुन्हा

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे

आ. लक्ष्मण पवारांनी घेतली मुख्य सचिवांची भेट

गेवराई : तालुक्यातील शहाजानपुर चकला येथे वाळूमाफियांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी चार जणांविरुद्ध नदीपात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

बीड तालुक्यातील तांदळवाडी येथील वाळू माफिया पांडुरंग चोरमले, विलास निर्मळ, संदीप निर्मळ आणि अर्जुन कोळेकर (सर्व रा.तांदळवाडी ता.बीड) या चौघांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ते अनेक दिवसांपासून सिंदफना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करत होते. हे चारही आरोपी सध्या फरार असून गेवराई पोलिस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार लक्ष्मण पवार यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.

Tagged