कारची दुचाकीला धडक ; आईचा मृत्यू, मुलगा जखमी

क्राईम बीड

बीड : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात मांजरसुंबा परिसरात दुपारी घडली. जखमी मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कमल साळवे व ऋषिकेश साळवे हे माय-लेक शनिवारी (दि.6) दुपारी पुण्याहून दुचाकीवरुन येत होते. मांजरसुंबा येथे त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वेगात असणार्‍या स्विफ्ट डिझायर कारने जोराची धडक दिली. या अपघातात कमल साळवे ही महिला गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाली तर मुलगा ऋषिकेश साळवे हा जखमी झाला. त्यास उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tagged