नात्यातीलच तरुणाने मित्रांच्या मदतीनेकेली अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या!

बीड

बीड दि.24 : मुलगी अल्पवयीन असल्याने कुटुंबीयांनी लग्नला विरोध केला, 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न लावून देऊ असेही सांगितले. मात्र नात्यातीलच तरुणाने मित्रांच्या मदतीने मुलीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपीने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना बीड तालुक्यातील घोसापूरी येथे शनिवारी (दि.24) रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

अश्विनी बन्सी माळी (वय 17 रा.घोसापुरी ता.बीड) असे मयत मुलीचे नाव आहे. नात्यातीलच वैजनाथ भगवान गायकवाड हा आश्विनी सोबत लग्न करण्यासाठी मागे होता. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे वय कमी आहे, तिचे वय 18 वर्ष झाल्यावर तुझ्यासोबत लग्न करू, आता बालविवाह होईल असे म्हणत लग्नाला विरोध केला. मात्र वैजनाथ ने आपल्या काही मित्रांच्या मदतीने शनिवारी (दि.23) मध्यरात्री अश्विनीला घराबाहेर बोलावले, तिच्यावर अत्याचार करत तिचा निर्घृण हत्या केली. त्यानंतर मित्र फरार झाले व वैजनाथने विषारी औषध प्राशन केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी उपअधीक्षक विशंभर गोल्डे, बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी
आरोपीने अत्यंत क्रूर पद्धतीने मुलीचा खून केला आहे. तरुणाई नशेच्या आहारी गेलेली असून असे कृत्य घडत आहेत. या प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करावी, प्रकरण फास्टट्रेक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.

Tagged