बीड:जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात विकास कामांना गती दिली आहे याचा एक भाग म्हणून मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारती बांधकामासाठी 6338.51 लाखांची तांत्रिक मान्यता काल मुंबई मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आली तसेच याबाबत शासन निर्णय देखील त्वरित निर्गमित करण्यात आला आहे.
बुधवारी दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 ला निघालेल्या शासन निर्णयानुसार विचाराधीन असलेल्या बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाबाबतच्या अंदाजपत्रकांची सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रु. ६३६८.५१ लक्ष इतक्या रकमेस तांत्रिक मान्यता प्रदान केली होती
जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाची प्रस्तावाची किंमत रु. १५ कोटी पेक्षा अधिक असल्याने सदर प्रस्ताव दि. १२/०९/२०२३ रोजी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.
उच्चस्तरीय समितीने स्थापत्य कामांचा यापूर्वीचा दर रु. ३०,०००/- प्रति चौ.मी. ऐवजी रू. २८,०००/- प्रति चौ.मी. असा बदल करून, अंदाजित रू. ५९.६१ कोटी इतक्या रकमेस सहमती दर्शविली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.