कुणबी, मराठा जात प्रमाणपत्रासाठी जनतेकडे असणारे उपलब्ध पुरावे समिती समोर 23 ऑक्टोबरला सादर करण्यासाठी आवाहन

बीड

बीड : मराठवाडयातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी जनतेकडे असणारे उपलब्ध पुरावे नागरिकांनी समिती समोर 23 ऑक्टोबरला सादर करता येतील.न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली मराठवाडयातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा दौरा सोमवार दिनांक 23 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यात आहे. या दौऱ्या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ०१ या कालावधीत अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर, दुपारी ०२ ते ०३ या वेळेत जनतेची निवेदने व पुरावे स्विकारणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज आदी समितीस उपलब्ध करुन देण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.