corona-death

अधिपरिचारिकेसह अन्य एकाचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील सोमवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली असतानाच आज (दि.२१) आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, येथील जिल्हा रुग्णालयातील ४० वर्षीय अधिपरिचारीकेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. त्यांचा अहवाल मध्यरात्री पॉझिटिव्ह आला होता. तसेच, येथील ६२ वर्षीय पुरुष औरंगाबाद येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांना वेंटीलेटरवर बीड येथे पहाटे आणण्यात आले होते. ते मृत अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पोहचले. दरम्यान, मृत्यूची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असून गेवराई येथील ६५ वर्षीय महिला देखील अत्यावस्थ आहे.

Tagged