PALLAVI SAWANT

मैत्रिणीसोबत पुण्याला जाऊन येते म्हणून गेलेली तरुणी बेपत्ता

केज न्यूज ऑफ द डे बीड

केज ठाण्यात हरवल्याची तक्रार

प्रतिनिधी । केज
दि.11 : मैत्रिणी सोबत पुण्याला कंपनीत कामासाठी जाऊन दोन दिवसात परत येते असे घरी सांगून गेलेली 21 वर्षीय तरुणी परत घरी न आल्यामुळे तिच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी ता. केज येथील पल्लवी बाबुराव सावंत ही 21 वर्षीय तरुणी तिच्या आई सोबत केज येथील फुले नगरमध्ये राहत आहे. तिची आई हॉटेल चालवीत आहे. 30 जुलै रोजी पल्लवी ही तिची आई शोभा बाबुराव जाधव हिला म्हणाली की, ती तिच्या मैत्रिणी सोबत पुणे येथे कंपनीत कामासाठी जात आहे. दोन दिवसात परत येते; असे सांगून गेलेली पल्लवी सावंत ही दहा दिवस झाले तरी परत आली नाही. त्यामुळे तिची आई शोभा जाधव यांनी केज पोलीस ठाण्यात तिची मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. तिचा रंग सावळा, अंगावर काळी जीन्स व भगव्या रंगाचा टॉप, हातावर खोडलेले गोंदण, उंची 160 सेमी, डोळे काळे, गोल चेहरा व सडपातळ बांधा या वर्णनाची तरुणी आढळून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा केज पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन तपासी जमादार धनपाल लोखंडे यांनी केले आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged