रशियाची लस तयार; पुतीन यांनी स्वतःच्याच मुलीला दिला पहिला डोस

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

जगाच्या आशा पल्लवीत : लस सुरक्षीत असल्याचाही रशियाचा दावा

वृत्तसंस्था । नवी दिल्ली
दि.11 : रशियाने सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे. जगातील पहिली कोविड लस त्यांनी तयार केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सर्वप्रथम ही लस आपल्या दोन पैकी एका मुलीला देऊन जनतेला अश्वासीत केलं आहे. स्वतः पुतीन यांनीच ही माहिती देत जगातील पहिली लस आम्ही बनवल्याची घोषणा देखील केली.

पुतीन म्हणाले की, ‘आम्ही कोरोनाची सुरक्षित लस बनविली आहे आणि देशात त्यांची नोंद देखील झाली आहे. मी माझ्या दोन मुलींपैकी एकीला प्रथम लस दिली आहे आणि तिला बरे वाटले आहे.’ रशियन अधिकार्‍यानी दिलेल्या माहितीनुसार, Gam-Covid-Vac नावाच्या या लसीला निश्चित योजनेनुसार रशियन आरोग्य आणि नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. ही लस वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक आणि जोखीम असलेल्या लोकांना दिली जाईल असे सांगितले जात आहे.

फॉम्युला चोरल्याचा रशियावर आरोप

एका महिन्यापूर्वी, रशियाने संकेत दिले होते की त्यांची लस चाचणीत आघाडीवर आहे आणि ते याची 10 आणि 12 ऑगस्ट दरम्यान नोंदणी करतील. दरम्यान या लसीबाबत अमेरिका आणि ब्रिटनला रशियावर विश्वास नाही. रशियावर वॅक्सिनचा फॉर्म्युला चोरण्याचा आरोपही लावण्यात येत आहे.

सप्टेंबरमध्ये उत्पादन. ऑक्टोबरपासून वितरण सुरू होईल
जगातील ही पहिली लस संरक्षण मंत्रालय आणि गमलय नॅशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी तयार केली आहे. सप्टेंबरमध्ये याचे उत्पादन करण्याची आणि ऑक्टोबरपासून लोकांना देण्याची तयारी सुरू केली असल्याचे रशियन अधिकार्‍यांनी जाहीर केले.

आरोग्यमंत्री म्हणाले – सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या

रशियन वृत्तसंस्था तास नुसार, मंगळवारी देशाच्या उच्च अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत अध्यक्ष पुतीन म्हणाले की, ‘माझ्या माहितीनुसार, आज सकाळी जगात पहिल्यांदाच कोरोनोव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी एक लस नोंदविली गेली आहे.’ पुतीन यांनी आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. मुराशको म्हणाले, ‘मला माहिती देण्यात आली आहे की आमची लस प्रभावीपणे कार्य करते आणि चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करते. मी पुन्हा सांगतो की यासाठी सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.’

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged