CORONA

बीड जिल्हा : 90 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोनाची आज गती मंदावल्याचे आकड्यावरुन स्पष्ट होत आहे. आज (दि.11) 11 वाजून 53 मिनिटांनी प्राप्त झालेल्या एकूण 614 अहवालांपैकी 90 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 520 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून 4 अणिर्नित आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात 8, परळी-20, केज-10, बीड-28, धारुर-3, माजलगाव-5, शिरुर-4, पाटोदा-1, आष्टी-6 तर गेवराई तालुक्यात 5 असे एकूण 90 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 2 हजार 138 झाली आहे. यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 805 आहे. तर 51 जणांचे मृत्यू झाले असून 1 हजार 282 इतके उपचाराखालील रुग्ण आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजचे अहवाल खालीलप्रमाणे

1
2
3
4
5
कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged