bpcl

आता व्हॉट्सअ‍ॅपवर करा गॅस बुकींग!

देश विदेश न्यूज ऑफ द डे

दि.12ः कोरोना काळात आधीच सोशल डिस्टंसिंग चे नियम कडक होत आहेत. घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे, अशातच महत्वाच्या कामांपैकी एक म्हणजे गॅस बुकींग आणि तेच आता सोपं झालं आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. भारत गॅसच्या ग्राहकांना घरगुती गॅस आता चक्क व्हॉट्सअपद्वारे बुक करता येणार आहे. भारत पेट्रोलिअमच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

बीपीसीएलने देशभरातील ग्राहकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून 1800224344 या बीपीसीएलच्या स्मार्टलाईन नंबरवर बुकिंग करता येईल.

रजिस्टर मोबाईल नंबरवरून ‘हाय’ लिहून पाठवल्यावर विविध माहिती तुम्हाला मिळेल. त्यानंतर व्हॉट्स अ‍ॅपवरून बुकिंग झाल्यावर एक कन्फर्मेशन मेसेज येईल. त्याबरोबर पेमेंट करण्यासाठी एक लिंक येईल. ऑनलाईन पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, अ‍ॅमेझॉन अशा विविध माध्यमांद्वारे करता येऊ शकते.

Tagged