lab corona

परळीचा एक पॉझिटिव्ह; औरंगाबादेत उपचार सुरु

परळी बीड

परळी : तालुक्यातील हाळंब येथील दोघे पॉझिटिव्ह होते, ते बरे झाल्याने आजच (दि.5) तालुका कोरोनामुक्त झाला होता. सायंकाळच्या सुमारास शहरातील औरंगाबादला उपचारार्थ नेण्यात आलेला एक व्यक्ती तेथे पॉझिटिव्ह आला आहे.

सदरील रुग्ण हा शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर परळी येथे राहणारा आहे. त्याला किडनीचा विकार असल्याने उपचारार्थ औरंगाबाद येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी सदरील रुग्णावर डायलिसिस करण्यात आलेले आहे. त्याची कोरोना चाचणी केल्यानंतर तो औरंगाबादेत पॉझिटिव्ह आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली आहे.