keij

कोयता,तलवारीने केजमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

केज क्राईम बीड

केज  : कोयता, तलवारीचा वापर करत केजमध्ये पारधी समाजाच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले असून केज पोलीसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, दि.4 जून रोजी केज येथील मुख्य रस्त्या लगत सायंकाळी 5 सुमारास पूर्वीचे जुने भांडण आपआपसात मिटविण्याच्या कारणावरून पारधी समाजाची बैठक बोलावली होती. त्यात हेव्यादाव्यावरून त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात चार दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. भांडणात दगड, काठी, कोयता व तलवारीने मारहाण झाल्याच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.  बापू बाबू काळे रा.केज यांच्या फिर्यादी नुसार राजाराम अच्युत काळे, बबलू अच्युत काळे, सुरेश बंकट काळे, लालू अच्युत काळे, रा बजरंग नगर केज आणि गंगाराम बापू पवार, गणेश पोपट चव्हाण, रवींद्र शामराव काळे व पापा बंकट पवार अशा दहा जणांच्या विरोधात गु.र. नं. 310/2020 भा. दं. वि. 326,324, 323, 04,506, 157,148 दाखल झाला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे तपास करीत आहेत. तर पापा बंकट पवार रा.शिवाजी चौक, दूध डेअरी जवळ कळंब यांच्या फिर्यादी खंडू बापू काळे, बापू बाबू काळे, सुरेश बाबू काळे, दीपक खंडू काळे, आकाश बापू काळे, बालाजी खंडू काळे, राजू छमु पवार, राहुल उत्तम शिंदे, शिवा बाबू शिंदे या दहा जणांच्या विरुद्ध गु.र.नं.211/2020 भा. दं. वि. 326, 324, 323, 147, 147, 149 व 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि.महादेव गुजर हे तपास करीत आहेत.