गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून बीडच्या तरुणाला पुण्यात लुटले

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार घेतले

बीड,  दि.14 :  बीड येथील एका तरुणाची गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून पुण्यातील व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यानंतर पुण्यात भेटायला गेल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करुन दहा हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
      कोंढवा ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय (नाव बदललेली आहेत) हा मुळचा बीड येथील आहे. तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. त्याने ब्लूड गे अ‍ॅपवर लॉगइन केले होते. यावेळी त्याची अजय नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यांच्यामध्ये काही वेळ चॅटींग झाले. यामध्ये दोघांनीही एकमेकांशी सहमतीने शारीरिक संबध ठेवायचे ठरवले. अजयने विजयला शिवनेरी येथे सकाळी बोलवले. तेथे एका इमारतीमध्ये विजयला नेण्यात आले. तेथे त्याला कपडे काढायला लावले. त्यानंतर अजयने छायाचित्र व व्हिडिओ काढायला सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या विजयने शारीरिक सबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अजयने दोन साथीरादांना बोलावून घेतले. यातील एकाने विजयला शस्त्राचा धाक दाखवला. तर इतर दोघांनी त्याला मारहाण केली व विजयला गुगल पेद्वारे दहा हजार रुपये भरण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tagged