आंबेवडगाव कंटेनमेंट झोन घोषित

धारूर बीड

बीड : धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली होती. आता जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गाव सील करण्याचे आदेश दिले आहेत.

आंबेडवडगाव येथील रुग्णास मुंबई येथून आल्याचा प्रवासाचा इतिहास आहे. त्याच्यावर माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याचा गावातही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकार्‍यांनी गाव सील करण्याचे आदेश दिले आहेत.

Tagged