पुरात वाहून गेलेला ५० वर्षीय व्यक्ती बेपत्ता

न्यूज ऑफ द डे बीड

एनडीआरएफकडून शोध मोहीम सुरू

माजलगाव : म्हशीला गवत चारा आणण्यासाठी राजेवाडी (ता.माजलगाव) बंधार्‍यावरून पुनंदगावकडे जाणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाचा तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून शोध कार्य सुरू केले आहे.

सतीश आश्रुबा पोटभरे असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजेवाडी बंधार्‍यावरून पुनंदगावकडे आपल्या म्हशीला चारा आणण्यासाठी राजेवाडी बंधार्‍यावरून जात होते. त्यावेळी पुराच्या पाण्यामुळे बंधारा तुडुंब भरून वाहत होता. यावेळी पोटभरे यांचा तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात पडते व पाहता पाहता वाहून गेले. येथील तहसीलदार वैशाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन या व्यक्तीला शोधण्यासाठी एनडीआरएफच्या टिमला पाचारण करुन पोटभरे यांची शोध मोहीम चालू आहे. याठिकाणी तहसीलदार वैशाली पाटील तळ ठोकून आहेत.

Tagged