‛एनडीआरएफ’चे पथक बीडमध्ये दाखल

न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

बीड : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गत तीन दिवसात पाण्यात वाहून जाऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री माजलगावमध्ये तिघे जण नदीपात्रात अडकले होते. याच अनुषंगाने बचाव कार्यासाठी ‛एनडीआरएफ’ला पाचारण करण्यात आले होते. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात एक पथक दाखल झाले.

डेप्युटी कमांडन्ट श्री.जिना हे पथकाचे प्रमुख असून त्यांच्यासह सोबत ४ अधिकारी व इतर कर्मचारी असे २२ जणांचे पथक आहे. हे पथक आज सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या पथकामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास आणखी बळकटी मिळणार आहे. दरम्यान, पथक प्रमुख डेप्युटी कमांडन्ट श्री.जिना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उमेश शिरके, बीडचे तहसीलदार शिरीष वमने यांच्यासह एनडीआरएफचे जवान उपस्थित होते.

आज पथक असणार मुक्कामी
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून काही भागात पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने एनडीआरएफचे पथक बीडमध्ये आजचा दिवस मुक्कामी असणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

Tagged