बीड जिल्हा : तब्बल 19 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात तब्बल 19 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये बीड तालुक्यातील 7, परळी-6, गेवराई-1, आष्टी-1, माजलगाव-2 तर अंबाजोगाई-2 रुग्णांचा समावेश आहे.

बीड तालुक्यात आढळून आलेल्यामध्ये 28, 24, 70, 36 वर्षीय पुरुष हे शहरातील एका खाजगी रुग्णालयातील पॉझिटिव्हच्या संपर्कातील असून बीड शहरातील रहिवासी आहेत. शिवाय एक 50 वर्षीय महिला तालुक्यातील लिंबा येथील आहे. तर 32 वर्षीय महिला देखील पॉझिटिव्ह असून ती शहरातील शाहूनगर भागातील राणूमाता मंदिराच्या पाठिमागे राहते. पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाची ती सहवासित आहे. शहरात आणखी एक 36 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळला असून तो माळीवेस भागातील आशापुरा फर्निचरच्या जवळ राहत असल्याचे प्रशासनाने कळविले.

परळी तालुक्यातील सर्व रुग्ण हे शहरातील असून 30 व 24 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष (रा.भीमनगर, परळी) हे तिघे पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाचे सहवासित आहेत. तर सिद्धार्थ नगर परळी येथील बारा वर्षीय मुलागाही पॉझिटिव्ह असून तो पूर्वीच्या रुग्णाचा सहवासित आहे. इंदिरानगर येथील 38 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह असून तो पूर्वीच्या रुग्णाचा सहवासित आहे. आणखी एक 50 वर्षीय महिला पॉझिटिव्ह असून ती जुने रेल्वे स्टेशन परळी येथील आहे. एसबीआय बँकेची ती ग्राहक आहे.

गेवराई तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळला असून तो रामनगर, तलवाडा येथील आहे. तो पूर्वीच्या रुग्णाचा सहवासिहत आहे. तर दुसरा 54 वर्षीय पुुरुष गेवराई शहरातील रंगार चौक येथील आहे.

आष्टी शहरातील दत्तमंदिर गल्लीतील 45 वर्षीय पुरुष देखील पॉझिटिव्ह असून तो पूर्वीच्या रुग्णाचा सहवासित आहे.

माजलगाव तालुक्यातील 24 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळला असून तो जदीद जवळ्याचा रहिवासी आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील 43 वर्षीय महिला आठ वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आले असून ते शहरातील मोरेवाडी (विलमसृष्टी) हे सर्वजण बार्शी येथून आल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

प्रशासनाला एकूण 470 अहवाल प्राप्त झाले असून त्यात 451 निगेटिव्ह आले आहेत.

Tagged