corona lasikaran

लसीकरणासाठी जाताय मग आता हे वाचा…

कोरोना अपडेट बीड

बीड जिल्हा प्रशासनाने काढले वेगळे अ‍ॅप

बीड- जिल्ह्यातील लसीकरणासाठी केंद्राकडून जे नोंदणी अ‍ॅप जारी करण्यात आले होते त्यामुळे लसीकरणात प्रचंड अडचणी येत होत्या. आता जिल्हा प्रशासनाकडून स्वतःचे वेगळे अ‍ॅप तयार करण्यात आले असून त्या अ‍ॅपचा वापर करून नागरिकांनी आपली नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांनी म्हटले आहे.
दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, 45 वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना दुसरा डोस घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी लसीकरणाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला त्यांनी 12 ते 16 आठवड्या दरम्यान दुसरा डोस घ्यावा. तर ज्या नागरिकांना कोवॅक्सिनचा डोस घेतला आहे त्यांनी किमान 4 आठवड्यानंतर दुसरा डोस घ्यावा, असे सांगितले आहे.

अशी आहे नाव नोंदणीची प्रक्रीया
जे नागरीक उपरोक्त सुचनेनुसार दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असतील त्यांनी तसेच 45 वर्षे वया वरील प्रथम डोस घेण्यास इच्छुक नागरीकांनी https://ezeeforms.com/Static/DynamicPage.aspx?Id=4B2B080E या लिंकवर क्लीक करावे. क्लीक केल्यावर कोविड 19 लसीकरणासाठी नोंदणी फॉर्म उघडेल. यामध्ये ज्यांना लस घ्यावयाची आहे त्यांचे संपुर्ण नाव, वय, अचुक मोबाईल नंबर लिंग व संपूर्ण पत्ता नोंद करावा. त्यानंतर आपणास ज्या लसीकरण केंद्रामध्ये लस घ्यावयाची आहे त्या लसीकरण केंद्राचे नाव यादीमधून निवडावे व आपला डोस निवडावा व त्यामध्ये दिलेला कॅप्चा टाकावा नंतर जी व्यक्ती हा फॉर्म भरत आहे त्याचा मोबाईल नंबर टाकावा व फॉर्म सादर करावा. आपण फॉर्म सादर केल्यानंतर आपणास त्या लसीकरण केंद्रांसाठी आपला टोकन नंबर येईल सदर टोकन नंबरचा स्क्रिनशॉट जपुन ठेवावा. माहीती भरताना अचुक मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे. चुकीचा मोबाईल नंबर भरल्यावर आपणस संपर्क साधणे शक्य होणार नाही. अशाप्रकारे नोदंणी केल्यानंतर आपण नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरने मोबाईल मध्ये Needly app install करुन रजिस्टर केल्यास आपणाला त्या अ‍ॅपमध्ये टोकनचे स्टेटस माहीती बघता येईल. टोकन क्रमांक व उपलब्ध लस साठयानुसार नागरीकांना एसएमएस व कॉल करून लसीकरणासाठी बोलावण्यात येईल. संदेश आल्यानंतरच नागरीकांनी लसीकरणासाठी येणे आवश्यक आहे. त्या दिवशी जर त्यांना येणे शक्य झाले नाही तर त्यांचा प्रतिक्षा यादीतील क्रमांक जाईल व पुनश्च नोदंणी करुन टोकन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा लागेल. प्रतिक्षा यादीतील लसीकरणा करीता बोलावण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या व्यतिरीक्त इतर नागरीकांनी लसीकरण केंद्रांवर येऊ नये.

  • यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंदावर येवून रजिस्टर मध्ये नोंदणी व प्रतिक्षा यादी तयार करण्याची पध्दती आता बंद करण्यात येत आहे.
  • यापुढे 45 वर्षे वयावरील नागरीकांना प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर न जाता घरबसल्या लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून प्रतिक्षा यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केल्या जाणार आहे व भविष्यात उपलब्ध होणार्‍या लसींच्या संख्येनुसार टोकन नंबरच्या क्रमांकानुसार त्यांचा नंबर आल्यावर एसएमएस व कॉलच्या माध्यमातून लसीकरणासाठी बोलावण्यात येणार आहे. ही व्यवस्था फक्त 45 वर्षावरील प्रथम व दुसरा डोस साठी लागू राहिल. ज्यांचेकडे अ‍ॅन्डॉईड मोबाईल नाहित अशा व्यक्तींना इतर कोणत्याही व्यक्तींकडून नोंदणी करून घेता येईल.
  1. वर नमुद केल्यानुसार नोंदणी केल्या नंतर जिल्हास्तरावर लस प्राप्त झाल्यानंतर एसएमएस व कॉलद्वारे बोलविण्यात येईल. केंद्रावर आल्यानंतर आपण लसीकरणाच्या मागदर्शक सुचनांनुसार पात्र असाल तरच लसीकरण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे आपण लसीकरणासाठी पात्र असाल तरच नोंदणी करावी.
  • 18 ते 44 या वयोगटाचे लसीकरण मात्र कोविन अ‍ॅपरवर सेल्फ रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतरच करण्यात येईल. त्यांच्यासाठी प्रतिक्षा यादीची सुविधा असणार नाही, याची नोंद घ्यावी तरी यापुढे नागरीकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळावी व दिलेल्या दिवशी दिलेल्या वेळेत लसीकरण केंद्रांवर यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
  • खालील पीडीएफ फाईलमधील पूर्ण सुचना पहा….
Tagged