बीड दि.27 : दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा आकडा थोडाफार कमी झाला होता. मात्र शनिवारी (दि.15) कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात 1 हजार 150 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.
आरोग्य विभागाला शनिवारी (दि.15) चार हजार 447 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 150 जण बाधित आढळून आले. तर 3 हजार 297 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-279 अंबाजोगाई 80, आष्टी 194, धारूर 69, गेवराई 97, केज 103, माजलगाव 100, परळी 38, पाटोदा 67, शिरूर 92 आणि वडवणी तालुक्यात 31 रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी