बीड जिल्हा : आज 1,112 कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दरदिवशी 1 हजार पेक्षा जास्त आहे. आजही एकूण 4783 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1112 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर 3671 अहवाल निगेटिव्ह आले.

यात अंबाजोगाई तालुक्यात 119, आष्टी 129, बीड 238 , धारूर 68, गेवराई 111, केज 121, माजलगाव 91, परळी 54, पाटोदा 98, शिरूर 66, वडवणी 17 असे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, बाधितांचा टक्का हा 27 टक्क्यांच्या घरात असल्याचे दिसून येत आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.

Tagged