आजच्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा मोठा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड  दि.13 ः बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. गुरुवारी 1 हजार 317 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यासह देशभरामध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासह आदींची कमतरता निर्माण झाली होती. पंरतु मागील दोन दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांचा आकडा वाढला आहे. गुरुवारी (दि.13) जिल्ह्यात 1 हजार 15 पॉझिटिव्ह आढळून आले. तर याच दिवशी 1 हजार 317 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा असाच वाढत राहिल्यास लवकरच कोरोनावर मात होईल. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 322 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

सविस्तर यादी पाहण्यासाठी

Tagged