atyachar

पतीसोबत वाद झाल्यामुळे माहेरी निघालेल्या विवाहितेवर अत्याचार!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंद; आरोपीस पाच दिवसाची कोठडी
बीड दि.13 ः किरकोळ कारणावरुन पतीसोबत वाद झाला. त्यामुळे माहेरी निघालेल्या 30 वर्षीय विवाहितेला एका तरुणाने रस्त्यात अडवले. तुम्हाला गावी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस पोलीसांनी अटक केली असून त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशाल रविंद्र कदम (वय 22 रा.शाहबाजपूर ता.बीड) असे आरोपीचे नाव आहे. 30 वर्षीय विवाहितेचा घरी पतीसोबत वाद झाला. त्यामुळे रागाच्याभरात ती माहेरी निघाली होती. रस्त्याने जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या विशाल कदम याने तुम्हाला गावी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने पतीसोबत बीड ग्रामीण ठाण्यात येवून तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे सहायक निरीक्षक अंतरप यांनी आरोपी विशाल यास ताब्यात घेतले. त्यास 11 मे रोजी न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tagged