पाटोदा बसस्थानकात ऑनलाईन चक्रीवर विशेष पथकाची कारवाई

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

बीड दि.13 ःः पाटोदा येथील बसस्थानकात ऑनलाईन चक्री सुरु असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांना मिळाली. शनिवार, 13 मे रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारला असता सहा आरोपी चक्री जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून दुचाकी, जुगाराचे साहित्य असा 2 लाख 62 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चक्री मालकासह सात जणांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात मोगल सैफ जाफर, आकाश बबन टकले,( दोघे रा.भूम ता.भूम जि.उस्मानाबाद), समीर सय्यद हशम (रा.पाटोदा), अनिल शिवाजी सानप (रा.गांधणवाडी ता.पाटोदा), अमोल बबन काळे (रा.पारगाव ता.पाटोदा), सय्यद असेफ जलील (रा.पाटोदा), शेख हरून शेख नबीलाल हे ऑनलाईन चक्री खेळताना जागीच मिळून आले तसेच चक्रीचा मालक मोगल सैफ जाफर अशा सात जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे, कर्मचारी सचिन काळे, शिवाजी डीसले, विनायक कडू यांनी केली.

Tagged