corona

बीड जिल्हा : आज ‘इतके’ कोरोनारुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१५) कोरोनाचे १५७ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आता आकडा हळुहळु वाढताना दिसत आहे.

जिल्ह्यातून सोमवारी २६२० जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.१५) प्राप्त झाले, त्यामध्ये १५७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर २४६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २३, अंबाजोगाई ७, आष्टी ३७, धारूर ४, गेवराई १७, केज २८, माजलगाव ९, परळी १४, पाटोदा ३, शिरूर ८, वडवणी ११ असे रुग्ण आढळून आले. कोरोनाचा आकडा शंभरच्या घरात येताच नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडला आहे.

Tagged