khun

लोखंडी दाताळ्याने चुलत्याला मारहाण!

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


चुलता गंभीर, केज तालुक्यातील घटना
केज
दि.15 : समाईक विहिरीच्या वादातून चुलत्याला लोखंडी दाताळ्याने मारहाण केली. यामध्ये चुलता गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना केज तालुक्यातील दरडवाडी येथे बुधवारी (दि.15) घडली. या प्रकरणी केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील दरडवाडी येथील गुरुलिंग बारीकराव दराडे व गोरख बारीकराव दराडे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या सामाईक विहिरीवरून सामाईक पाईप लाईन केलेली आहे. या पाईपलाईनच्या कारणा वरून अनेक वेळा गुरुलिंग दराडे व त्यांचे भाऊ गोरख दराडे आणि पुतणे श्रीहरी दराडे यांच्यात भांडणे होत आसत. 12 जून शनिवार रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान गुरुलिंग दराडे यांनी त्यांचा भाऊ गोरख दराडे आणि पुतण्या श्रीहरी दराडे यास पाईपलाईनचे टोपण का काढलेस? असे विचारल्या वरून गुरुलिंग दराडे यांना त्यांचा पुतण्या श्रीहरी दराडे याने शेतातील दाताळ्याने मारहाण केली. तसेच त्यांचा सख्खा भाऊ गोरख दराडे यानेही लोखंडी पाईपणे मारहाण केली आणि सिमा दराडे व सोनाली दराडे यांनी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यात गुरुलिंग दराडे यांच्या कपाळावर खोलवर जखम झाली आहे. आरडाओरड ऐकून जवळच्या शेतात पाळी घालीत असलेला गुरुलिंग दराडे यांचा मुलगा प्रकाश दराडे हा पळत आला व त्याने सोडवासोडवी केली. तो जखमी वडील गुरुलिंग दराडे यांना नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जात असताना पुन्हा गोरख दराडे याने गाडी अंगावर घालून जीवे मारण्याची धमकी दिली. गुरुलिंग दराडे यांच्यावर नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जखमी गुरुलिंग दराडे यांची प्रकृती गंभीर आसल्यामूळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील फिनिक्स या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जखमी गुरुलिंग दराडे हे अद्यापही बेशुद्ध आहेत. गुरुलिंग दराडे यांचा मुलगा प्रकाश याने दि.14 जून रोजी केज पोलीस स्टेशनला हजर होऊन दिलेल्या तक्रारी नुसार श्रीहरी गोरख दराडे, गोरख बारीकराव दराडे, सिमा गोरख दराडे आणि सोनाली श्रीहरी दराडे यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचे उद्देशाने व घातक हत्याराने मारहाण करणे व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे. या आरोपाखाली गु.र.नं. 292/2021 कलम 307, 326, 323, 504, 506 आणि 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत.

Tagged