माजलगावच्या धरणात पोहायला गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव – तालुक्यातील बेलोरा येथील व माजलगाव येथे वास्तव्यास असलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे सकाळी माजलगाव धरण मध्ये पोहण्यासाठी गेले. त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.18) रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडली असून त्यांचे प्रेत सापडले नही.

तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ वय 45 वर्षे यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे ते गेल्या काही दिवसापासून माजलगाव येथे वास्तव्यात होते. रोज सकाळी माजलगावच्या धरणामध्ये पोहायला जात होते दररोजच्या प्रमाणे रविवारी ते पोहायला गेले असताना पोहत पोहत ते लांब गेले पोहत परत येत आसतांना त्यांना दम लागुन बुडुन मृत्यू झाल्याची घटना रविवार रोजी सकाळी घडली. धरणामध्ये बुडालेल्या प्रेताची शोध मोहीम चालू असून बीडच्या बचाव कार्य पधकाला बोलवले असून आकरा वाजेपर्यंत पथक आले नव्हते. या ठिकाणी तहसीलदार वर्षा मनाळे व माजलगाव शहर पोलीस उपस्थित आहेत.

धरणाच्या लांब ठिकाणी पोहायला गेलेल्या फपाळ यांचा दम लागुन मृत्यू झाला असावा . त्यांचे प्रेत सापडण्यासाठी या ठिकाणी कोणीही रिस्क घेण्यास तयार नसल्याने बीडच्या बचाव कार्यपथकाला बोलवले असून पथक येताच शोध मोहीम चालू केली जाईल.
वर्षा मनाळे
तहसीलदार, माजलगाव

Tagged