बुडालेल्या डॉ.फपाळांचा मृतदेह शोधण्यास अपयश; एनडीआरएफची टिम घेणार शोध

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव दि.18 : माजलगाव धरणात (majalgav dam) पोहण्यासाठी गेलेले डॉ.दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.18) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. माहिती मिळाल्यापासून त्यांचा मृतदेहाचा धरणामध्ये शोध सुरु आहे. सायंकाळी 7 पर्यंत त्यांचा मृतदेह आढळून आलेला नव्हता तसेच अंधार पडल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली होती.

माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय 45) (dattatray fapal) यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसापासून माजलगाव येथे वास्तव्यात होते. रोज सकाळी माजलगावच्या धरणामध्ये पोहायला जात होते. दररोजच्या प्रमाणे रविवारी ते पोहायला गेले असताना पोहत पोहत ते लांब गेले पोहत परत येत असताना त्यांना दम लागल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. धरणात बुडालेल्या मृतदेहाचा शोध घेण्याची मोहीम सकाळपासून सुरु आहे. यासाठी बीड, परळी येथील बचाव कार्य पथकाला बोलावण्यात आलेले आहे. तसेच माजलगाव अग्निशमन दलासह स्थानिक भोई यांच्याही माध्यमातून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी तहसीलदार वर्षा मनाळे, तलाठी आर.आभारे, माजलगाव शहर पोलीसांची उपस्थिती होती.

घटनास्थळी तहसीलदार वर्षा मनाळे, तलाठी आर.आभारे, माजलगाव शहर पोलीसांची उपस्थिती होती.

शोध मोहिम थांबवली

रविवारी दिवसभर धरणामध्ये शोध मोहिम सुरु होती. अंधार पडल्यानंतर ही शोध मोहिम थांबवण्यात आली असल्याचे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सांगितले.

एनडीआरएफची टिम होणार दाखल
बीड, परळी येथील बचाव कार्य पथकासह स्थानिक भोई, माजलगाव अग्निशमन दल यांन शर्थिचे प्रयत्न करुनही डॉ.दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह आढळून आला नाही. सोमवारी सकाळी पुणे येथून एनडीआरएफची टिम माजलगावात दाखल होणार आहे.

धरणावर शोध मोहिम सुरु असताना शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Tagged