antigen test swab

बीड जिल्हा : आज पाठवलेल्या स्वॅबचा आकडा प्रचंड मोठा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड जिल्ह्यात दररोज वाढत आहे रुग्णांचा आकडा

बीड, दि.11 : बीड जिल्ह्यातून कोरोनाच्या तपासणीसाठी आज पाठविण्यात आलेले स्वॅबचा आकडा प्रचंड मोठा आहे. आज विविध तालुक्यातून शे दोनशे नव्हे तर तब्बल 717 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सर्वाधिक स्वॅब हे परळीतून पाठविण्यात आले आहेत. येथील एसबीआय sbi शाखेचे बहुतांश कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तर शाखेच्या संपर्कातील अनेकांना कारोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे एसबीआय शाखेच्या संपर्कात आलेल्या सर्वांचेच नमुने आरोग्य विभागाने घेतलेले आहेत. आज पहाटे तब्बल 20 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आज पाठविण्यात आलेले स्वॅब पुढील प्रमाणे
1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21
2) कोविड केअर सेंटर बीड 42
3) ग्रामीण रुग्णालय आष्टी 06
4) ग्रामीण रुग्णालय माजलगाव 50
5) उपजिल्हा रुग्णालय गेवराई 21
6) उपजिल्हा रुग्णालय केज 05
7) उपजिल्हा रुग्णालय परळी 534
8) कोविड केअर सेंटर आंबाजोगाई 37
9)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई 01

एकूण बीड जिल्हा 717


Tagged