प्रतापगडाच्या बुरुजाजवळ एक भाग दरीत ढासळला; वेळीच लक्ष दिल्यास अनर्थ टळण्याची शक्यता

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

वृत्तसंस्था दि.11 ः छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आणि ऐतिहासिक ठेवा आहेत. गडकिल्ले यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने नुकत्याच दिलेल्या वृत्ताप्रमाणे, प्रतापगडाच्या बुरुजाजवळचा एक भाग दरीत ढासळला आहे. यामागचे कारण नक्की कळू शकले नसले तरी खालचा भाग ढासळल्याने कठडाही दरीत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ध्वजबुरुजाजवळ बुरुजाच्या खालचा भाग दरीत ढासळला आहे. बुरुजाचा संरक्षण कठडा सुरक्षित असून वेळीच लक्ष दिले तर धोका टाळता येऊ शकतो.