akash yadav

दंगल नियंत्रण पथकातील कर्मचारी आकाश यादवचे अपघाती निधन

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात

 बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डानपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बीड दंगल नियंत्रण पथकातील कर्मचारी आकाश यादवचे अपघाती निधन झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.10) रात्री 10 च्या सुमारास गेवराई तालुक्यातील गढी परिसरात घडला.

       आकाश सुदामराव यादव (वय 23 रा.खेर्डा ता.माजलगाव) हा बीड येथे दंगल नियंत्रण पथकात कार्यरत होता. शुक्रवारी दुचाकीने बीडकडे जात असताना तालुक्यातील गढी गावाजवळील उड्डानपुलावर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेने ते गाडीवरून लांब फेकले गेले. त्यामुळे गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी यादव यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मृत्यू झालाचे डॉ. एस.एस दागंट यांनी घोषित केले. खेर्डा येथे शासकिय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. आकाशचे वडील सुदामराव यादव हेही पोलीसमध्ये होते. ड्युटीवर असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागी अनुकंपावर आकाश हा 2018 मध्ये पोलीसमध्ये भरती झाला होता. शुक्रवारी तो गावाकडून बीडकडे येत असताना ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged