corona

पैठणमध्ये सात पॉझिटीव्ह

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण : पैठण शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 22 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी शनिवारी आरोग्य विभागाने पाठविले होते. रविवारी याचे रिपोर्ट आले असून त्यात तब्बल सातजण पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरामध्ये पहिले 14 आता नव्यांना 7 रुग्णांची भर पडली आहे.

अधिक माहिती अशी की पैठण येथील कोरोना बाधित रुग्ण दिवसंदिवस मोठ्या प्रमाणावर आढळत असून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व मित्रपरिवार यांचे 22 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी येथील आरोग्य विभागाने शनिवारी घेतले होते. यापैकी रुग्णाच्या थेट संपर्कात आलेले काही खाजगी दवाखान्यातील कंपाउंडर यांचे रिपोर्ट बाधित आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाच्या अपुर्‍या व्यवस्थेमुळे मोठी तारांबळ उडाली आहे. असे असले तरीही मोठा गाजावाजा करून डिजिटल चेक पोस्ट गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. यामुळे शहरांमध्ये बाहेरगावाहून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांची रहदारी सुरूच आहे. नेहमीप्रमाणे रुग्ण राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करून हा परिसर रहदारीसाठी बंद करण्याचा उपयोजना नगरपरिषदेच्या वतीने सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिले आहे.

Tagged