गाडेपिंपळगाव येथील पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


सिरसाळा दि. 27 : नदीला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची घटना सहा दिवसापूर्वी परळी तालुक्यातील गाडेपिंपळगाव येथे घडली होती. पोलीसांसह विविध यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेवूनही मृतदेह आढळून येत नव्हता. त्यांनतर मृतदेहाच्या शोधासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र पाणी खुप असल्याने शोध यंत्रणेला यश येत नव्हते शेवटी आज गुरुवारी (दि.27) सकाळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सकाळी दहा वाजता मृतदेह आढळून आला.

आकाश आरगडे हा युवक नदीच्या पुरामध्ये वाहून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडत नसल्यानें गेल्या काही दिवसांपूर्वी माजलगाव धरणात एक व्यक्ती बुडाला होता. त्याचा शोध काही तासांमध्ये घेण्यात आला. त्यापद्धतीने सदरील तरुणाचा शोध घेण्याची मागणी केली कुटुंबांनी केली होती. आकाश आरगडे यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन सापडलेल्या ठिकाणींच सूरू असून अंत्यविधीही तिथेच होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार बाबुराव रुपणर यांनी दिली.

Tagged