ACB TRAP

एक हजाराची लाच घेतांना शाखा अभियंता पकडला

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

 गेवराई दि.5 : ग्रामपंचायत येथे नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अंदाजपत्रकाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्विकारताना शाखा अभियंता यास एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.5) दुपारी गेवराई येथे करण्यात आली.
शेख समद नूर मोहम्मद (वय- 57 वर्ष पद शाखा अभियंता (स्थापत्य) ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग जिल्हा परिषद गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने तक्रारदारास ग्रामपंचायत येथे नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अंदाजपत्रकाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष एक हजार रुपये लाचेची मागणी केली. व एक हजार रुपयांची लाच स्विकारतांना शाखा अभियंता कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग जि.प. गेवराई कार्यालयात रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी, पोना.हनुमंत गोरे, पोशि.प्रदीप वीर, मनोज गदळे यांनी केली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
———

Tagged