sahal-chaus

माजलगावचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची प्रकृती खालावली

बीड माजलगाव

बीड, दि.9 : माजलगावचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची प्रकृती सध्या खालावली आहे. ते बीडच्या क्वारंटाईन जेलमध्ये असताना शनिवारी त्यांना मायनर अटॅक आला. त्यानंतर त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याची माहिती चाऊस यांचे बंधू तालेब चाऊस यांनी दिली.
4 मार्च रोजी त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

Tagged