माजलगाव देखील 21 ऑगस्टपर्यंत बंद

कोरोना अपडेट बीड माजलगाव

दि. 9 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज ही पाच शहरे 12 ऑगस्टच्या रात्री 12 पासून 21 ऑगस्टपर्यंत पुर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण आताच त्यांनी दुसरी ऑर्डर काढली असून त्यात माजलगावचा देखील समावेश केला आहे . बीड शहरात 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान रॅपीड अन्टिजेन टेस्ट सुुरु आहेत. काल दिवसभरात 86 जण या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर आज दुपारपर्यंत 65 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. त्यातच दरदिवशी येणारी जिल्हाभरातील कोरोनाची आकडेवारी आता 200 च्या पुढे सरकली आहे. काल दिवसभरात 203 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. कालपर्यंत जिल्ह्याची आकडेवारी 1585 होती तर मृत्यूसंख्या 39 वर पोहोचली आहे.

काय आहे जिल्हाधिकार्‍यांचा आदेश?

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged