माजलगाव : येथील आमदार प्रकाश सोळंके हे गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून लक्षणे जाणवत असल्यामुळे कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर सध्या पुण्यात खासगी उपचार रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मंत्रालयात मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात मंत्र्यांसोबत बैठकही घेतली होती. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.