tirupati

तिरुपतीच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

तिरुपती, दि.10 : लॉकडाऊननंतर तिरुपती मंदिर सुरू करण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपतीची ओळख आहे. कोरोना काळात लॉकडाऊन जारी केल्यानंतर हे मंदिर 11 जूनपर्यंत बंद होते. 11 जून रोजी हे मंदिर भाविकांच्या आग्रहाखातर उघडण्यात आले. त्यानंतर मंदिरातील 743 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी आतापर्यंत 403 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत 3 कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तिरुपती प्रशासनाने सांगितले की मंदिर सुरू करताना कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले. सर्व भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करण्यात आले होते. ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या त्याची सर्व स्तरांतून प्रशंसा करण्यात आली होती. फक्त मंदिर प्रशासनाच्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झालेली नाही. संपूर्ण राज्य आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे असे प्रशासनाने म्हटले. जुलैमध्ये देशभरातून 2 लाख 38 हजार भाविकांनी तिरुपती मंदिराचे दर्शन घेतल्याचेही प्रशासनाने नमूद केले.

आंध्र प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 10 हजार 820 रुग्ण सापडले आहेत. तर 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 27 हजार 860 रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 87 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात 1 लाख 38 हजार 712 सक्रिय रुग्ण आहे तर आतापर्यंत 2 हजार 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आमचा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Tagged