lachkhor police

हातचालाखी करून लाईनमनच्या अंगठ्या पळवल्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.10: आम्ही पोलीस आहोत, कुठे निघालात? इथे तस्करी चालते. अशा उघडपणे अंगठ्या घालून फिरायचे नाही. लवकर त्या अंगठ्या काढा आणि हातरूमालात बांधा, असे म्हणत दोन भामट्यांनी हातचालाखी करून रुमालात बांधलेल्या साडेतीन तोळ्याच्या चार अंगठ्या लंपास केल्याची घटना बीड ते मांजरसुंबा रोडवर शनिवारी दुपारी घडली.

आमचा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बन्सीधर गणपती भोसले (रा. धांडे नगर, बीड) हे लाईनमन शेतातील काम आटोपून भोसले शनिवारी दुपारी साडेबारा वाजता बीडकडे निघाले होते. मांजरसुंबा बीड रोडवर त्यांना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. त्यापैकी एकाने ओळखपत्र दाखवून पोलीस इन्स्पेक्टर असल्याची बतावणी केली. गांजा तस्करीची तपासणी सुरु असल्याचे सांगत त्याने भोसले यांची झडती घेतली. त्यादरम्यान त्याने भोसले यांचा मोबाईल, रोख रक्कम आणि सोन्याच्या चार अंगठ्या काढून रुमालात बांधल्या आणि त्यांच्याकडे देत याठिकाणी तस्करी चालते, असे उघडपणे सोन्याच्या अंगठ्या घालून फिरत जाऊ नका, असे म्हणत त्यांना लवकर घरी जाण्यास सांगितले. त्यांनतर भोसले यांनी तो रुमाल खिशात टाकला आणि बीडकडे निघाले. काही अंतर पुढे गेल्यानंतर संशय आल्याने त्यांनी दुचाकी थांबवून रुमाल तपासला असता त्यात 96 हजार रुपये किमतीच्या एकूण साडेतीन तोळ्याच्या चार अंगठ्या गायब असल्याचे त्यांच्याा लक्षात आले. याप्रकरणी बन्सीधर भोसले यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.