corona-death

केजच्या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

केज न्यूज ऑफ द डे बीड

केज : तालुक्यातील माळेगाव येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचा औरंगाबादमध्ये आज (दि.१६) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मयत कोरोनाग्रस्त महिलेचे किडनी ट्रान्सप्लांट होऊन औरंगाबाद येथून 3 जून रोजी तिला सुट्टी देऊन घरी पाठवले. परंतु घरी आल्यावर त्रास सुरू झाल्याने केजमधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस ऍडमिट करूनही त्रास कमी होत नसल्याने 10 जून रोजी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे 15 जून रोजी स्वॅब पॉझिटीव्ह आल्याची माहिती केजच्या आरोग्याला मिळाली होती. परंतु आज सकाळी तिचा आज सकाळी मृत्यू झाला.

Tagged