MURDER

अनैतिक संबंधातून 17 वर्षीय युवकाला जिवंत जाळले

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

आरोपी पोलीसांच्या ताब्यात

पैठण : शेजारी राहणार्‍या युवकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या रागातून त्याला घरी बोलावून मारहाण करत जिवंत जाळून टाकले. ही घटना पैठण तालुक्यातील दिन्नापुर येथे घडली. या प्रकरणी बिडकीन पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, वैभव मोहनराव खनसे (वय 17) असे मयताचे नाव आहे. पैठण तालुक्यातील दिन्नापुर येथे काही दिवसापूर्वी गणेश आत्माराम गायकवाड हे कुटुंबासह दिन्नापूर येथे राहत होते. त्यांच्या शेजारीच वैभव मोहनराव खनसे हा राहत होता. वैभव आणि गणेशच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय गणेशला होता. त्यामुळे या संशयावरून त्यांच्या काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. तेव्हापासून गणेश व वैभव एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र शनिवारी गणेशने वैभवला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतले. उशिरापर्यंत तो घरी न आल्यामुळे त्याला शोधण्यासाठी त्याचे नातेवाईक गणेश यांच्या घराकडे गेले. यावेळी गणेश घाईगडबडीत पळून जात असताना त्यांना दिसला. त्यास वैभव कुठे आहे अशी विचारणा केल्यानंतरही त्यांनी या ठिकाणावरून काहीही न बोलता पलायन केले. घरातून मोठ्या प्रमाणात धूर येत नातेवाईकांनी घरामध्ये धाव घेतली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला वैभवचा मृतदेह निदर्शनास आला. त्याच्या डोक्यावर मोठी जखम दिसून आली व अंगावरील कपडे अर्धवट जाळून टाकण्यात आले होते. घरामध्ये डिझेलची रिकामी कँड, लोखंडी पाइप पडलेला होता. वैभवचा खून पूर्ववैमनस्यातून गणेश गायकवाड यांनी केल्याची फिर्याद भारत मोहनराव खनसे दिन्नापुर ता.पैठण यांनी बिडकीन पोलिस ठाण्यात दिली. सपोनि.राजेंद्र बनसोड हे पोउपनि.प्रशांत मुंडे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने तपास करून या घटनेतील प्रमुख सूत्रधार गणेश गायकवाड याला अटक करून त्याच्याविरुद्ध 302 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, पोहेका.जि.जि राऊत, सतिश शिंदे, शिवानंद बनगे, अर्जुन जोरले हे करीत आहे.

Tagged