पैठण तालुक्यातील खंडाळा येथील घटना
पैठण दि.20 : पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील तरुणाच्या पत्नीचे सासरच्या मंडळीने बळजबरीने दुसर्याशी विवाह लावला. या नैराश्यातून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि.19) घडली.
पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील पारधी समाजातील मुकेश रेहमान चव्हाण (वय 25 रा. खंडाळा ता. पैठण ह. मु. एरंडगाव ता.शेवगाव) याचा काही वर्षापुर्वी एरंडगाव येथील मुलीशी विवाह झाला होता. नात्यातीलच मुलगी असल्यामुळे मुकेश घरजावाई म्हणून राहत होता. परंतू पतीपत्नीमध्ये सतत वाद होत होता. त्यामुळे मुलीच्या कुटूंबीयांनी तिचा विवाह दुसर्या तरुणासोबत लावून दिला. या नैराश्यातून मुकेशने मंगळवारी आपल्यागावी जावून विष प्राशन करुन आत्महत्या केली. विहमांडवा पोलीस चौकीचे जमादार संजय मदने यांनी पंचनामा करून सदरील घटनेची नोंद पोलिस ठाण्यात केली. मयत युवकाच्या अंत्यविधी प्रसंगी कुठलाही वाद विवाद होऊ नाही म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Related