विष प्राशन केलेल्या ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

पैठण दि २१ :- पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिडकीन येथील ग्रामसेवक संजय हरिभाऊ शिंदे यांचा उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. पंचायत समितीत खळबळ उडाली आहे.
पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामसेवक संजय हरिभाऊ शिंदे यांनी मंगळवारी (दि.19) पैठणचे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील सिटी केअर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे त्यांनी आखिर मंगळवारी रोजी सकाळी १० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे पैठण पंचायत समितीत खळबळ उडाली आहे. भ्रष्ट गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक संघटनेने आज गुरुवारी जिल्हाभर ग्रामसेवकाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांची निधनाची वार्ता कळताच पैठण तालुक्यातील ग्रामसेवकांनी औरंगाबाद येथील सिटी केअर रुग्णालयात धाव घेतली आहे.

Tagged