ACB TRAP

वडवणी पोलिसांची लाचखोरी चव्हाट्यावर!

क्राईम न्यूज ऑफ द डे वडवणी


एनसी निकाली काढण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना कर्मचारी पकडला

दि.20 : उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.20) वडवणी पोलीस ठाण्यात 10 हजार रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. रेवणनाथ गंगावणे असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रार आल्यानंतर अवघ्या दोन तासात ही कारवाई करण्यात आली आहे. या ठाण्यात सहायक निरीक्षक आनंद कांगूने हे आल्यापासून या ठाण्यात लाचखोरी अधिकच वाढल्याची माहिती आहे.

शिक्षकाच्या भावाचे शेतीच्या कारणावरून शेजार्‍यासोबत वाद होते. या कारणावरून शेजार्‍याने शिक्षकावर देखील एनसी दाखल केली होती. ही एनसी निकाली काढण्यासाठी रेवणानाथ गंगावणे याने 50 हजार रुपयांची लाच मागीतली होती. मात्र तडजोडीअंती ही रक्कम 10 हजार रुपये ठरवली. 10 हजारांची लाच घेताच गंगावणे यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई उस्मानाबादचे उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी दुपारी दिडच्या सुमारास करण्यात आली.

Tagged