दोन गुंठ्यात 27 लाखांचं पीक, पण पोलीस आले अन् सगळं सपलं

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

मातोरी दि.13 : वरचेवर शेती नापिक होत आहे. बोगस बियाणे, बोगस खते, रासायनिक औषधे यामुळे तर शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला आहे. त्यात आता दुष्काळाजन्य परस्थिती. त्यामुळे अनेकांनी आता गांजाच्या शेतीची वाट धरली आहे. मात्र या शेतीला कायद्याने परवानगी नसल्याने शेतकरी लपून छपून हे पीक घेत आहेत. शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव येथे एका शेतकर्‍याने दोन गुंठे जमीनीत गांजा लावला. पण या गांजाचा वास पोलीसांपर्यंत गेलाच. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (ips pankaj kumawat) यांनी या शेतीवर छापा मारून तेथून 27 लाख 27 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत.

संभाजी हरिभाऊ कराड असे गांजा शेतात लावणार्‍या आरोपीचे नाव आहे. चकलांबा ठाणे हद्दीतील घोगस पारगाव (ता.शिरुर कासार) येथील  कराड याने आपल्या शेतात गांजा लागवड केल्याची माहिती, सहाय्यक  अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. कुमावत यांच्यासह गेवराईचे उपविभागीय पोलीस आधिकारी निरज राजगुरू, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे, चकलांबाचे सहाय्यक निरीक्षक नारायण एकशिंगे आदी अधिकार्‍यांसह पथकाने छापा टाकला. यावेळी शेतात पाच क्विंटल 54 किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी जप्त केलेल्या या गांजांच्या झाडांची किंमत 27 लाख रुपये आहे. आरोपी संभाजी कराड याच्यावर फौजदार राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत फौजदार इंगळे, फौजदार तांदळे, फौजदार राजेश पाटील, फौजदार आनंद शिंदे, अमोल येळे, खेडकर, बालासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, संतोष गित्ते आदींचा समावेश होता.
———-

Tagged