MURDER

चुलत पुतण्याने धारदार शस्त्राने काकाचा केला खून!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील घटना
घाटनांदूर  दि.4 : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे एका वृद्धावर तरुणाने तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला आहे.
जनार्धन मुंजा धोंगडे (वय 65 रा.घाटनांदूर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास जनार्धन हे त्यांच्या राहत्या घरासमोर असताना अर्जून धोंगडे याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात जनार्धन धोंगडे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि.राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Tagged