अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने शेतकऱ्यास चिरडले; नातेवाईकांचा आक्रोश

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई : सकाळी शेतामध्ये जात असलेल्या शेतकऱ्यास अज्ञात वाळूच्या हायवा टिप्परने चिरडले. नातेवाईकांनी मृतद्देह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान घडली.
गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते (वय 60) हे सकाळी 6.30 च्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षस भुवन येथून अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या अज्ञात हायवाने त्यांना चिरडले. यामध्ये ते जागीच ठार झाले असून त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याने पूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाला आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अवैधरित्या चालणारी वाळू उपसा तत्काळ बंद करा व दोषींवर कारवाई करा, यासाठी गावकर्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास गावकर यांनी नकार दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Tagged